बालकलाकार कु.आर्यन विलास पाटील याचे मा. आमदार श्री. सदानंदजी चव्हाण यांच्याकडून खास अभिनंदन

 


खेड:- प्रतिनिधी दिपक मांडवकर

चिपळूण तालुक्यातील श्रीक्षेत्र परशुराम येथील बालकलाकार कु.आर्यन विलास पाटील याला अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्याबद्दल मा.आमदार श्री.सदानंदजी चव्हाण यांनी त्याचे खास अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्याच्या उत्तम अभिनयाबद्दल देशातील विविध राज्यांमधील आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बाल कलाकार, बुलढाणा फिल्म सोसायटीच्या वतीने राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार यांसह नुकताच जाहीर झालेल्या रत्नसिंधू प्रज्ञा गौरव अशा राज्यांतर्गतही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सहावी इयत्तेत शिकणाऱ्या ११ वर्षाच्या आर्यन पाटील या बाल कलाकाराने दोन चित्रपटांसह चार  लघुपटात आपले अभिनय कौशल्य दाखवून कला रसिकांची मने जिंकली आहेत.त्याबद्दल आजपर्यंत सुमारे ५३ पुरस्काराने त्याचा गौरव झाला आहे. त्याबद्दल आज मा.आमदार श्री.सदानंदजी चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कु.आर्यन विलास पाटील यांचे घरी भेट देऊन अशा या गुणी बाल कलाकाराच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्याचे खास अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी सोबत अभयदादा सहस्त्रबुद्धे, उपतालुकाप्रमुख संदेश आयरे, सरपंच गजानन  कदम, विकास बहुतले, पांडुरंग येसरे, तुकाराम बडबे, सुनील बडबे, विलास पाटील, लेखक नंदा आचरेकर, ऍड. प्रशांत सावंत, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

टिप्पण्या