मुंबईत होळी,धुलिवंदन उत्सव साजरा करण्यास मुंबई महानगरपालिकेची मनाई

 

मुंबई (प्रतिनिधी ) महाराष्ट्रा गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची झपाट्याने वाढ होत आहे.त्यातच मुंबईत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.दररोज तीन हजाराच्या टप्प्यात रुग्ण वाढत आहेत.या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आता कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

 या अंतर्गत येत्या  रविवारी असणारा होळीचा उत्सव,तसेच त्यानंतर येणारा धुलिवंदन हा उत्सव खाजगी किंवा सार्वजनिक अशा कोणत्याच ठिकाणी साजरा करण्यास मुंबई महानगरपालिकेकडून मनाई करण्यात आली आहे.या संदर्भातील परिपत्रक मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.तसेच नियम मोडणाऱ्यांवर साथरोग कायदा 1897,आपत्ती निवारण कायद 2005,भादंवि 1860नुसार कारवाई केली जाईल असे नमुद करण्यात आले आहे.

टिप्पण्या