जिल्हयातील खाजगी रुग्णालय ताब्यात घ्यावीत; माजी आमदार पंडितशेठ पाटील यांची सूचना
प्रतिनिधी: (संदीप लाड)
कोरोनाच्या वाढता रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यभरात रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने खाजगी रुग्णालये ताब्यात घेऊन कोरोनाग्रस्त रुग्णांवर प्राधान्याने उपचार सुरू करावेत. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण वाढत आहे. नव्या रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत म्हणून भीतीचे वातावरण निर्माण होत आहे बेड उपलब्ध नसल्याने कोरोना संसर्ग रुग्णांवर उपचार थांबता कामा नये. यासाठी जिल्यातील खाजगी रुग्णालये जिल्हा प्रशासन यांनी तात्काळ ताब्यात घेऊन तेथे कोविड केअर सेंटर उभे करून रुग्णांवर उपचार सुरू करावे, अशी सूचना शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी दिली, त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होऊन त्याचा उपचारा अभावी मृत्यु येऊ नये अशी अपेक्षा त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा