संतापजनकः कल्याण-भिवंडी फाटा येथील टाटा आमंत्रा कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे हाल,अनेक रुग्ण वाऱ्यावर


ठाणे (प्रतिनिधी) कल्याण-डोबिवली महानगरपालिकेच्या टाटा आमंत्रा कोविड सेंटरमधील बेड खचाखच भरले असून रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.ना वेळोवेळी तपासण्या,ना डाॅक्टरांची उपलब्धता,ना सोयीसुविधा अश्या अवस्थेत असलेल्या रुग्णांपुढे आता जीवीताचा प्रश्न निर्माण झाल्याची बाब समोर येत आहे.

 कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सुरु केलेल्या टाटा आमंत्रा या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना सोयीसुविधा नसल्यामुळे हाताळण्याची विदारक परिस्थिती समोर येत आहे.डाॅक्टर,नर्स,वार्डबाय आदी कमी मनुष्यबळाच्या संख्येअभावी येथील रुग्णांचे प्रचंड हाल होत असून कोणी उपचार करता का? उपचार? असे ओरड़ण्याची वेळ कोविड रुग्णांवर येवून टेपली आहे.येथील परिस्थिती गंभीर असून रुग्णांना बेडच उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचा खच पडला आहे.येणारे रुग्ण ठेवायचे कुठे या अवस्थेत हे कोविड सेंटर आहे.

 रुग्णांनाचा सफाईची कामे

रुग्णांना कोविड झाल्यानंतर त्यांना टाटा आमंत्रा या सेंटरमध्ये भरती केलं जात आहे. या सेंटरमध्ये साफ सफाई करण्यासाठी हाऊसकिपींगची माणसे असली तरी रुग्णांकडूनच रुमची साफसफाई करुन घेतली जात आहे.अनेक रुग्ण हात सलाईनची सुई घेवूनची साफसफाई करीत असल्याचे प्रकार घडत आहेत.त्यामुळे एखादा सिरीयस असलेल्या रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.

कोवि़ड सेंटरमध्ये कमी मनुष्यबळ

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कोविड सेंटर उपलब्ध करुन दिले असले तरी या सेंटरमध्ये रुग्णांना सोयी सुविधांचा मोठी अडचण निर्माण झालेली आहे.रुग्णालयात दररोज बेडशीट बदलण्यात येत नसून रोगराईला हे रुग्णालय आमंत्रणच देत आहे.सध्या रुग्णालयात २१ वार्डबाय,२२ सिस्टर,१५,डाक्टर आहेत.मात्र येवढ्या मोठ्या कोविड सेंटर असलेल्या रुग्णांना सेवा अपुरी पडत आहे.परिणामी रुग्णांना कोणतीच तत्पर सेवा पुरविला जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

 

साहित्याची मागणी करुनही पुरवठा नाही

 सध्या कोविड सेंटरमध्ये 2300 पेशंट असून त्यांचे वेळोवेळी बेडशीट बदलणे गरजेचे आहे.तितकीच साफसफाईही ठेवणे गरजेचे आहे.यासाठी आमच्याकडून दहा दिवसांपुर्वीच सेंटरला या संदर्भातल्या मागणीचे लेटर दिले असून अद्याप साहित्य पुरविण्यात आले नाही.तेथून सेंटरलाच साठा उपलब्धता नसल्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही तात्काळ बेडशीट आणि मनुष्यबळ पुरविले जावे यासाठी मागणी केली आहे.

 -  डाॅ.दिपाली मोरे,आरोग्य अधिकारी,टाटा अमारा कोविड सेंटर

 दरम्यान भारतीय जनता पार्टीचे कामागार आघाडीचे नेते श्री महेश मोरे यांनी कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेता राज्यांचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तात्काळ सुविधा पुरविल्या जाव्यात अशी मागणी केली आहे.

टिप्पण्या