राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघात अद्यावत कोव्हिडं सेंटर उभारणार : आमदार डॉ.राजन साळवी
आमदार स्थानिक विकास निधी मधून १ कोटी मंजूर राजापूर/प्रतिंनिधी : जिल्ह्यात कोरोंनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आमदार डॉ.राजन साळवी यांनी राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये अद्यावत कोव्हिडं सेंटरउभारण्याचे आश्वासित केले असून आमदार स्थानिक विकास निधी मधून १ कोटी रुपयाचा निधी मंजूरी घेण्यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडे प्रस्ताव सदर केला आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी दिनांक १८ एप्रिल रोजी राजापूर तालुक्यातील कोव्हिडं-१९ च्या प्रादुर्भाव व उपाययोजने बाबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीमध्ये कोव्हिड-१९ आजाराच्या बाबत चर्चा करण्यात आली. सदर चर्चेमध्ये आमदार डॉ.राजन साळवी यांनी कोरोंनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयावर वाढता ताण पाहता तसेच रुग्णांना रुग्णवाहिकेमधून रत्नागिरी येथे नेण्याची परवड थांबण्यासाठी राजापूर विधानसभा मतदार संघाच्या मध्यवर्ती ठिकाणी अद्यावत कोव्हिडं सेंटर उभारणार असल्याचे सूचित केले. व त्यासाठी मतदार संघातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे ओणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मधील परिचारिका प्रशिक्षण केंद्राची पूर्णत्वास आलेली इमारत वापरण्यास योग्य असून तेथे ३० बेड चे सुसज्ज अद्यावत कोव्हिडं सेंटरउभारणे शक्य होईल, असे सूचित केले. तसेच त्यांनी यासाठी दिनांक १६ एप्रिल,२०२१ च्या शासननिर्णयानुसार आमदार स्थानिक निधी कार्यकर्मांतर्गत कोव्हिड १९ वैद्यकीय यंत्र सामुग्री व साहित्य खरेदी साठी रुपये १ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून सदर निधी अद्यावत कोव्हिडं सेंटरउभारणेसाठी देण्याचे मान्य केले आहे. व त्यानुषंगाने त्यासाठी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचेकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे संगितले. तसेच सदर अद्यावत कोव्हिडं सेंटर भरण्यासाठी १ कोटी निधी पेक्षा अधिक निधी लागल्यास निधी उपलब्ध करून देण्याचे आमदार डॉ.राजन साळवी यांनी मान्य केल.
सदर चर्चेनंतर परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत समवेत आमदार डॉ.राजन साळवीयांनी पाहणी केली असून त्यानुषंगाने ना.उदय सामंत यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना संबधित विभागाला तात्काळ सूचना देण्याचे आदेश दिले. सदर अद्यावत कोव्हिडं सेंटरझाल्यास रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
फोटो कप्शन - परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची पाहणी करताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत समवेत आमदार डॉ.राजन साळव, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे,प्रभारी उपविभागीय अधिकारी श्री.बनसोडे, तहसिलदार प्रतिभा वराळे,नगराध्यक्ष जमीर खालीफे,गटविकास अधिकारी श्री.पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.मेस्त्री, डॉ.स्वामी, सार्वजनिक बांधकाम,उपभियंता श्री.कुलकर्णी,श्री.दुधारे, पोलिस निरीक्षक श्री.परबकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा