नालासोपारा - नालासोपारा पूर्व विभाग
येथील कोविड लस विषयी आता नागरिक जागरूत झाले असून. प्रत्येकजण आपली नोंदणी शासनाच्या
ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून करून देखील त्यांना शासनाच्या वैद्यकीय विभागातून लस
घेण्याची तारीख मिळत नसल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. दररोज नागरिक मोरेगाव
तलाव वैद्यकीय विभाग लसीकरण केंद्राच्या ठिकाणी लास घेण्यासाठी गर्दी करत आहेत. तरीही
लस मिळत नसल्याने नागरिकांना गैरसोय होत आहे.
त्या करीता बहुजन विकास आघाडीचे वाड नं ३९
चे संपर्क प्रमुख डॉ. संजय जाधव यांनी स्वतः या विषयी नागरिकांना सहकार्य करण्याकरिता
व झालेल्या गैरसोयीची पाहणी करण्या करता मोरेगाव तलाव वैद्यकीय विभागातील वैद्यकीय
अधिकारी श्री. डॉ. संपत यांच्याशी संपर्क साधून लशी विषयी चौकशी केली. व नागरीकांना
योग्य पद्धतीने लशिकरणा साठी तारीख मिळावी. अशी मागणी केली असून पुढील वेळी प्रत्येक
नोंदणी धारकाला मोबाईल क्रमांकावर लशी करणा पूर्वी संदेश दिला जाईल अशी मागणी केली. नागरिकांनी देखील विनाकारण घरा बाहेर न
पडता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संदेशा प्रमाणेच लसीकरण ठिकाणी उपस्थित राहावे. अशी विनंती
केली आहे. त्या बद्दल नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा