भडे ग्रामपंचायतीच्यावतीने महिला सक्षमीकरणसह कॉविड-१९ लसीकरण आणि विशेष व्यवसायिक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 

प्रतिनिधी: दिपक मांडवकर

       कोरोना काळात प्रथम ग्रामस्थांची काळजी घेणारी ग्रामपंचायत म्हणजे अखंड लांजा तालुक्यात अग्रेसर असलेली निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत भडे सर्वात पुढे असताना आता मात्र महिलांचे मनोबल बढवणाऱ्या उपक्रवार भर देत आहे.

    भडे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्री. सुधीर तेंडुलकर, माजी सरपंच संजीवकुमार राऊत, तंटामुक्त अध्यक्ष श्री. वासुदेव आगरे मुंबई प्रतिनिधी गणपत आगरे आणि ग्रामपंचाय सदस्य यांच्या उपस्थितीत प्रमुख मार्गदर्शक सौ. नीलम आनंद पालव (अनुसया महिला स्वयंसेवी संस्था) रत्नागिरी बचतगट प्रतिनिधि याच्या मार्गदर्शनाने  कॉविड लसीकरण जनजागृती, महिला व्यवसायातून उन्नतीकडे  शेती पूरक व्यवसाय व विवीध मसाले उत्पादन व बाजार पेठ माहिती बचतगट समिती करण, कार्यपद्धती योजना व व्येवस्था अश्या विविध घटकांतील माहिती महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. व शेवटी भडे ग्रामपंचायतचे सरपंच श्री सुधिर तेंडुलकर यांनी आभार मानून कार्यक्रम संपन्न केला. तर सर्व महिलांनी आता आम्ही देखील एक पाऊल पुढे टाकण्यासचा नक्की प्रयत्न करू.  आणि सर्व महिला मंडळाच्या वतीने मार्गदर्शक सौ. नीलम आनंद पालव यांचे आभार मानले.

टिप्पण्या