लोेटे एमआयडीसीतील आगीत मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई न मिळाल्यास उग्र आंदोलन - संदिप फडकले,मनसे
खेड:- दीपक मांडवकर
गेल्या काही दिवसात लोटे एमआयडीसी मध्ये एका मागोमाग एक स्फोट होत आहेत. आणि त्या स्फोटात अनेक कामगार मृत्युमुखी पडत आहेत. कामगारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचे एकमेव कारण कंपनी सुरक्षा यंत्रणा. कामगारांना होणारा त्रास आणि होणारी जीवित हानी यावर नियंत्रण आणण्यासाठी काहीतरी उपाय योजना आखल्या पाहिजे.काही घातक कंपन्या त्वरित बंद झाल्या पाहिजे. कंपनीत आग लागली तर विझविण्यासाठी आवश्यक योजना कंपनीत नसतात.समर्थ केमिकल कंपनीत आग लागली आणि कामगारांना जीव गमवावा लागला.अशा कंपन्यांवर योग्य ती कारवाई करावी. मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटूंबाना कंपनीने जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी आणि नाही दिली तर आम्ही मिळवून देऊ असे ही संदिप फडकले बोलले आहेत.
लोटे एमआयडीसी मध्ये ही ४ थी आग लागण्याची घटना आहे. आग लागण्याचे असेच चित्र सुरू राहणार काय...? कामगारांच्या जीवाची पर्वा आहे की नाही.असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार जिल्हा सरचिटणीस श्री.संदिप फडकले यांनी उपस्थित केला आहे. कंपनी मध्ये सुरक्षा यंत्रनेचा अभाव, कंपनीचे चुकीच्या पध्दतीचे बांधकाम, तसेच नियमांचे पालन न करता उत्पादन चालू असते.
अशाच घटना घडत राहिल्या तर अनेकांचे संसार उध्वस्त होत राहतील.अनेक कुटूंब रस्त्यावर येतील.अशा घटना लोक विसरून जातात म्हणून येत्या काही दिवसात अशा कंपन्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करणार असे मनसेचे कामगार जिल्हा सरचिटणीस संदीप फडकले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा