पनवेल मधील करंजाडे येथे शिवसेने तर्फे रक्तदान शिबीर संपन्न



पनवेल:-

       कोरोणा महामारी उग्र रूप धारण केले आहे. महाराष्ट्रात सर्वधिक रुग्ण संख्येमुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख तथा मा आमदार मनोहर शेठ भोईर पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ शेठपाटील यांच्या सूचनेनुसार उरण विधान सभा क्षेत्रात विभागवार रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. करंजाडे शहरात आज त्या निमित्त शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले  या वेळी जिल्हा संघटक सदानंद राव भोसले यांनी सदिच्छा भेट घेतली. प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख गौरव गायकवाड संघटक चंद्रकांत गुजर उलवे शिवसेना शहर प्रमुख प्रथम शेठ पाटील विभाग प्रमुख नंदकुमार मुण्डकर महिला विभाग प्रमुख सई पवार रामेश्वर आंग्रे रोहिदास भोईर व अन्य मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या