कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, लांजा संघटनेच्यावतीने तालुक्यातील साटवली आरोग्य केंद्राला कोरोना प्रतिबंधक साहीत्याची भेट

 


लांजा: श्री. दीपक मांडवकर

         लांजा तालिक्यात आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असून अपुऱ्या साधन सामुग्री मुळे सेवा बजावणाऱ्या आरोग्य केंद्र अधिकारी, कर्मचारी वर्ग यांना मर्यादा पडत आहेत हे प्रथम लक्षात घेता कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा लांजा या सामाजिक संघटनेच्या वतीने या कोरोनाच्या   महामारीच्या अनुषंगाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी, प्राथमिक स्थरावर कोरोनचे निदान होण्यासाठी साटवली येथे ऑक्सिमिटर २, इन्फ्रारेड थर्मामीटर २, सॅनिटायझर ५ लिटर कॅन, सॅनिटायझर १०० मिली ५ बॉटल, ग्लोव्हज ४००, आणि ३०० मास्क इतर  वैद्यकीय साधन सामुग्री भेट म्हणून देण्यात आली.

यावेळी लांजा तालुक्यातील साटवली आरोग्य केंद्र अधिकारी ड्रॉ. सौ. पाखरे , ड्रॉ. सौ.तावडे सुपरवायझर श्री. साळुंखे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तर  इसवली गावच्या आशा सेविका सौ. प्रमिला कदम यांना आवश्यक असलेले ऑक्सिमिटर लांजा शाखा सहसचिव श्री. सुभाष पालकर यांच्या माध्यमातून देण्यात आले. 

या कार्यासाठी लांजा शाखा खजिनदार श्री. प्रकाश चंदुरकर, कुणबी युवा लांजाचे पदाधिकारी श्री. शाहू सावंत, ग्रामीण स्तरावर लांजा शाखा सहसचिव श्री. चंद्रकांत करंबेळे,  ग्रामीण श्री. वसंत घडशी, गवाणे गावचे माजी सरपंच श्री. आत्माराम करंबेळे,  साटवलीचे सरपंच श्री. दत्ताराम सावंत, कुणबी समाज सक्रिय कार्यकर्ते महेश चंदुरकर, गणेश चंदुरकर इत्यादी मंडळी उपस्थित होती. या सहकार्याने आता ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टिप्पण्या