कोरोनामुळे निधन झालेल्या लांज्यातील कै. रमेश दाभाळेकर यांच्या मुलांना लोकनेते अविनाशदादा लाड यांनी घेतले दत्तक
लांजा (प्रतिनिधी ) लांजातील तालुक्यातील कुर्णे पडये वाडीतील कै.रमेश दाभोळकर यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले असून त्यांचे संपुर्ण कुटंब अडचणीत आले आहे.याप्रसंगी नवी मुंबईचे माजी उपमहापौर,लोकनेते मा.श्री अविनाशदादा लाड यांनी कै.दाभोळकर यांच्या पाल्यांना दत्तक घेतले असून अशा कठीण प्रसंगी कुटंबियांच्या पाठीशी उभे राहणारे लाड हे तालुक्यातील एकमेव नेते आहेत.त्यांनी केलेल्या या समाजकार्याबद्दल लांजा तालुक्यासह कुर्णे गावातील नागरिकांनी आभार मानले आहेत.
लांजा तालुक्यातील कुर्णे गाव,पडये वाडीतील ग्रामस्थ कै.रमेश दाभोळकर यांचे कोरोना संसर्गामुळे नुकतेच निधन झाले आहे. दाभोळकर हे घरातील एकमेव कमवते व्यक्ती असल्याने त्यांच्यावर मोठा आर्थिक संकट ओढवले आहे.कै.रमेश दाभोळकर यांच्या पश्चात स्वतचे वयोवृद्ध वडील,दोन मुली आणि अपंग विकलांग मुलगा आहे.दाभोळकर यांच्या पत्नीचे यापुर्वीच निधन झाले होते.पत्नीचे निधन झाल्यानंतर मुलांचे पालनपोषणाची जबाबदारी कै.दाभोळकर यांच्यावर होती.मात्र त्यांचेही कोरोनामुळे निधन झाल्याने आता वयोवृद्ध वडील मुलांचा संभाळ कसा करणार..असा प्रसंग या कुटूंबावर आला होता.
मात्र नवीमुंबईचे माजी उपमहापौर तथा स्थानिक लोकनेते मा.श्री अविनाशदादा लाड यांना समाजसेवक चंद्रकांत करंबेळे यांच्यामार्फत माहीती मिळाली.त्यांनी कुटूंबावर आलेले प्रसंग कळविले.सर्व हकीगत एकून मा.श्री अविनाशदादा लाड यांनी तातडीने आपल्या कार्यकर्ते श्री चंद्रकांत दाभोळकर, श्री अनंद दाभोळकर,श्री संकेत माईल यांनी कुटूंबियांची भेट घेत आर्थिक स्वरुपातील मदत,किराणा किट आणि मोठ्या मुलीच्या शिक्षणाचा संपुर्ण खर्च उचलणार असल्याचे सांगितले.त्यामुळे कुर्णे गाव तसेच लांजा तालुक्यातील नागरिकांनी लोकनेते श्री अविनाश दादा लाड यांचे मनपुर्वक आभार मानले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा