तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर आमदार डाॅ.राजन साळवी यांची राजापूर तालुक्यातील किनारपट्टीला भेट

 



राजापूर -  तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील किनारपट्टीवर येण्याची शक्यता असल्यामुळे लांजा राजापूरचे आमदार डाॅ राजन साळवी यांनी  रात्रभर किनारपट्टीवरील जिल्हा परिषद सदस्य व सरपंच यांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

स्वत सकाळी ६ वाजल्यापासून आढावा घेण्यासाठी राजापूरच्या किनाऱ्यावर भेट दिली. जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने प्रशासनाने सज्ज राहावे व मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी प्रशासनास आदेश असल्याने या कर्तव्य दक्षतेची अंमलबजावणी होते की नाही हे    पाहण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य दिपकजी नागले यांच्या सह कशेळी व वाडपेठ आणि वेत्ये किनारपट्टी लागत घरांना भेट देऊन समुद्र किनारी वाहणाऱ्या वादळी वाऱ्याच्या अंदाज घेतला.

  त्याप्रसंगी सुपुत्र अथर्व राजन साळवी, कशेळी सरपंच सोनाली मेस्त्री, माजी सरपंच प्रकाश दुकले, वाडपेठ सरपंच नंदिनी जाधव, सुनील रुमडे, राजू जाधव, तलाठी गायकवाड, ग्रामसेवक लांजेकर, सुनील जाधव, रोहन पावसकर, नंदूकुमार फोडकर, नंदा पवार, ग्रामसेवक पिठलेकर व मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या