महामारीत सापडलेल्या १५० अपंग बांधवाना कामगार नेते श्री महेश मोरे यांच्याकडून मोफत अन्नधान्य वाटप
ठाणे ( प्रतिनिधी ) इतरांप्रती समर्पणाचा भाव असणे हिच
जीवनाची सार्थकता आहे.याच प्रेरणेतून ठाण्यातील भारतीय जनता पार्टीचे कोकण प्रदेश सरचिटणीस श्री
महेश मोरे हे अनेक कुटूंबाचे अन्नदाते ठरत आहेत.त्यांच्या प्रयत्नातून कोरोनाच्या
महामारीमुळे टाळेबंदीत उपासमार होऊन हातावर पोट असलेल्या गरजू,कष्टकरी,अपंग
बांधवांच्या 150 कुटूंबांना मोफत किराणा वाटप करुन अतुलनीय कार्य करीत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. या टाळेबंदीचे नियम पाळत असताना मात्र अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. जनतेची सेवा करणारे समाजसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे श्री महेश मोरे हे व्यतीत झाले. अण्… फुल ना फुलाची पाकळी का होईना, परंतु सामाजिक भावनेतून आपण या कष्टकऱ्या अपंग बांधव आणि भगिणींना काहीतरी मदत केली पाहिजे, हि खूणगाठ मनाशी बांधली आहे. त्यांनी कष्टकरी गरजू कामगार ,अपंग बांधवांना १५० किट त्यामध्ये गहू, तांदूळ, साखर, तेल, मीठ, पोहे,कडधान्य असे १ महिना पुरेल एवढे अन्नधान्य, किराणा किटचे मोफत वाटप आज ठाणे स्टेशन परिसरात केले.
यावेळी बोलताना श्री महेश मोरे
म्हणाले की, आलेले सर्व लोक स्वाभीमानी आहेत.कोरोनाच्या फटका त्यांच्या पोटावर
पडला आहे.त्यांनी मला काल फोन केला,सांगितले की दिड वर्षापासून आमचं सगळं बंद आहे.घरात
आर्थिक अडचणी त्यांनी सांगतिल्या.ते बांधव अपंग असले तरी टाळेबंदीपुर्वी काही ना
काही मेहनत करुन गुजराण करीत होते.ते स्वकमाईतून खात होते.मी सध्या त्यांना
महिनाभराचे राशन दिले आहे.मात्र भविष्यात मदत लागल्यास मी तुम्हाला घरपोच करेन.सर्व
बांधव शहराच्या विविध भागातून आले होते.कुणी दिवा,शिवडी,ठाणे आदी परिसरातील होते.
दरम्यान भारतीय जनता पार्टीचे कामगार
आघाडीचे सरचिटणी महेश मोरे यांच्या या उपक्रमामुळे सर्व अपंग बांधवांनी आभार मानले
आहेत.अपंग बांधवांकडे कोणीच लक्ष देत नाही.त्यामुळे इतर सामाजिक संस्थांनीही मदत
करण्यास पुढे सरसावले पाहीजे असे आवाहन श्री महेश मोरे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा