श्री.अमेय लिमये ठरत आहेत देवरूखमध्ये अंधारात प्रकाश देणारा वीज दूत
प्रतिनिधी: दिपक मांडवकर
संकटात मदतीला धावून येतो तो देवदूत, पण वीज गेली की अंधारात मदतीला धावून येणारा आणि प्रकाश देणारा म्हणजे "वीज दूत" ! देवरूख मध्ये वीज गेली की अंधारात मदतीला धावून येणारा आणि प्रकाश देणारा वीज दूत म्हणजे अमोल लिमये! देवरुख जवळच्या साडवली येथील वीज दूत अमेय लिमये ची तशी पार्श्वभूमी राजकीय आहे. त्याचे काका म्हणजे श्री राजाभाऊ लिमये हे रत्नागिरी जिल्ह्यातील मोठे राजकारणी आहेत. अमेय लिमये चे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेय तो पत्रकारितेत करिअर केले, पण त्या क्षेत्रात तो फारसा रमला नाही! अमेय परंपरागत छपाईच्या व्यवसायात चांगला रमला. तसेच अमेयची मूळची राजकीय पार्श्वभूमी असल्याने त्याचा दांडगा लोकसंपर्क होता. त्यामुळे त्याने छपाईच्या व्यवसायात चांगला जम बसवला. तसेच या व्यवसाया बरोबरच त्याने काही छंद जोपासले. त्यातील प्रमुख छंद म्हणजे विविध देशातील नाणी/ डॉलर तसेच आपल्याकडील जुन्या नाण्यांचा अमेयने संग्रह केला. पण यापलीकडे त्याचा एक नवीन छंद होता. त्याला छंद म्हणणे कितपत योग्य आहे. कारण त्याच्या या छंदामुळे अनेकांच्या घरातील अंधार जाऊन प्रकाश पडतो हे मात्र नक्की आहे.
गेली अनेक वर्ष अमेय ज्या सह्याद्री नगर परिसरात रहातो त्या परिसरात वीज खंडीत झाली की याची चारचाकी गाडी सुरु होते.या परिसरातील महावितरणच्या अभियंताना तातडीने गाठायचे आणि मग जिथे फॉल्ट असेल तिथपर्यंत स्वखर्चाने; स्वतःच्या चारचाकीने त्यांना घेऊन जायचे, आणि फॉल्ट मिळेपर्यंत महावितरणचे कर्मचा-यांबरोबर रानोमाळ फिरायचे. जिथे गाडी जात नसेल तर तिथे पायपीट करायची, आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शक्य तेवढी मदत करायची. गेले अनेक वर्ष रात्र असो दिवस; उन असो वा पाऊस अमेयचे हे मदत कार्य अहोरात्र सदैव सूरु असते.तसेच वीज खंडित झाल्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांची दुसरी बाजू वीज ग्राहकांना अमेय व्यवस्थित पटवून देतो. ती बाजू खरीही असते. तसेच गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्याचा ७५% भाग अंधारात असतांना अमेय स्वतःचा काम धंदा सोडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांबरोबर सगळा परिसर अक्षरशः पिंजून काढत होता.ज्यांना अमेय च्या या कामाची माहिती आहे ते त्याला मोबाईलवरुन वीज पुरवठा कधी सूरळीत होईल याबद्दल अपडेट घेत असतात. काही जण तर आपल्या परिसरातील तक्रारी महावितरणला फोन करुन न सांगता थेट अमेय च्या कानावर घालतात. स्वतःचा कोणताही स्वार्थ नसताना अमेय लिमये करत असलेले हे काम खूपच कौतुकास्पद आहे. यात मुळीच शंका नाही. म्हणूनच अमेयला सर्वजण वीज दूत म्हणतात ते खोटे नाही. कारण तो खरच वीज मंडळा चा वीज दूत म्हणूनच काम करतोय. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.अधिक माहितीसाठी अमेय लिमये - 8806011666 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा