भाजपच्या दिव्या ढोले यांच्या वतीने गरजू कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप
मुंबई(शांत्ताराम गुडेकर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ७ वर्षाच्या यशस्वी कार्यकाळाला सलामी देत कोरोनोच्या कठीण काळाच्या पार्श्वभूमीवर या दुसऱ्या टप्यातील लॉकडाऊन मध्ये कष्टकरी कुटुंबाना ज्यांची कामे या काळात हातून गेली अशा गरजू कुटुंबाना भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र सचिव तसेच संकल्प सिद्धी ट्रस्टच्या विश्वस्त श्रीमती दिव्या ढोले यांच्या व यूनिफाईड डेटा - टेक सोल्युशन्स प्रा. लिमिटेड" यांच्या संयुक्त विद्यमाने अंधेरी पश्चिम येथील साथ बंगला- वर्सोवा ह्या परिसरात १००० कुटुंबियांना राशन किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला यूनिफाईड डेटा टेक सोल्युशन्स कंपनी चे संचालक हिरेन मेहता आणि त्याचे सर्व कर्मचारी, पियुष विभाकर, संकल्प सिद्धी ट्रस्ट च्या ट्रस्टी श्रीमती राज्यश्री खोपकर, संस्थेचे सहकारी भारत शर्मा, कमल कक्कर, मोहन नैनानी, अखील मेहता, गोपी नायर, ऍड घनश्याम मुलानी, झुबेर शेख, सलमा शेख, जी ७ मॉलचे कर्मचारी आणि वर्सोवा येथिल सर्व टीम लीडर्स ज्यांनी गरजू कुटुंबांची यादी संस्थेपर्यंत पोहचवली. त्यामुळे सर्व गरीब गरजू एक हजार कुटूंबियांना एक महिना पुरेल एव्हढे रेशन किट देऊन थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिव्या ढोले यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा