मुंबई उच्च न्यायालय कर्मचारी श्री. चंद्रकांत करंबेळे आणि मुंबई उच्च न्यायालय वकील सहकारी अधिकाऱ्यांच्या सहयोगाने लांजा झापडे गावातील गरजू मुलांची दत्तक पालक योजनेतून पूर्ण शिक्षणाची उचलली जबाबदारी.

 

लांजा: प्रतिनिधी दिपक मांडवकर

      लांजा:  मंगळवार दिनांक २९ जून २०२१ रोजी लांजा येथे समाजसेवक लांजा तालुक्यातील गवाणे गावचे सुपुत्र श्री. चंद्रकांत करंबेळे आणि मुंबई उच्च न्यायालय वकील सहकारी  अधिकाऱ्यांच्या सहयोगाने लांजा झापडे गावातील गरजू मुलांची दत्तक पालक योजनेतून पूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली. लांजा जि. प. पूर्ण  प्राथमिक शाळा झापडे येथील गरजू मुलांना दत्तक पालक योजनेतून आर्थिक साहाय्य केले. व पूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली. येथील ग्रामीण भागातील मुलांची शैक्षणिक सुविधा पाहता मुलांना शिक्षणाची आवड असून देखील केवळ आर्थिक दृष्ट्या अभावी शिक्षण घेणे अवघड होत आहे. याची पाहणी करून मुंबई उच्च न्यायालयातील वकील सहकारी अधिकारी ऍड श्री. जीतेंद्रजी मिश्रा, ऍड श्री. रामचंद्र मेंदाडकर, ऍड श्री. मनोहर मांडवकर, ऍड श्री. नरेंद्र बांदिवडेकर, ऍड श्री.शांताराम भावके, ऍड श्री. सारंग आराध्य, श्री. ऍड दिलीप चव्हाण हे सर्वजण निस्वार्थी सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून निराधारांचा आधार बनत आहेत. या मदत सहकार्य स्थळी गरजू विद्यार्थी व जि. प. पूर्ण प्राथमिक गावणे शाळा क्र. १ मुख्याध्यापक श्री. नथुजी सोनवणे, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा झापडे मुख्यद्यापीका सौ. निलांबरी चंद्रकांत परवडी म्याडम, शिक्षिका सौ. सुप्रिया खंडकर, शिक्षक श्री. संजय पवार व पालक वर्ग उपस्थित होते.





      

टिप्पण्या