समाजसेवक श्री.चंद्रकांत करंबेळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने श्री नरेंद्र नेनो कॉ. हा. सोसायटीच्या राहिवाश्यांना केले कोरोना प्रतिबंधक साहित्य वाटप
रत्नागिरी : प्रतिनिधी दीपक मांडवकर
लांजा तालुक्यातील गवाणे गावचे सुपुत्र तथा कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजा तालुकाचे सह सचिव आणि मुंबई उच्च न्यायालय येथे कार्यरत असणारे श्री. चंद्रकांत शिवराम करंबेळे व त्यांचे मुंबई उच्च न्यायालयातील वकिल सहकारी अधिकारी मंडळींनी रत्नागिरी खेडशी, नरेंद्र नेनो कॉ. हा. सोसायटी मर्यादित फेज नं.१ या सोसायटी मधील रहिवाश्यांना कोरोना पासून सौरक्षणा करीता वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले. त्यात ऑक्सीमीटर आणि टेम्परेचर थर्मो मीटर इत्यादी वस्तू सुपूर्त करण्यात आल्या. तर श्री. चंद्रकांत करंबेळे यांच्या कार्याचा विविध क्षेत्रात समावेश असून अत्यंत गरजू मुलाना देखील सहकार्य मिळत आहे. या कार्यक्रमात जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा गवाणे क्र. १ चे मुख्याध्यापक श्री. नथुजी सोनवणे, नरेंद्र नेनो कॉ. हा. सोसायटीचे आरोग्य अधिकारी श्री. सतीशजी कांबळे, श्री. मारुतीजी सावंत देसाई, श्री गजानन हिरवे, श्री. दिनेश लिंगायत, श्री. सुनील सावंत, श्री. संतोष पाटोळे, श्री. राजेंद्र लारवंडे, श्री. मंगेश जंगम, श्री. प्रफुल जाधव, श्री सिद्धेश सरवणकर उपस्थित होते. सदर कार्याला सर्व क्षेत्रातुन शुभेच्छा येत असून श्री. चंद्रकांत करंबेळे यांचे नरेंद्र नेनो कॉ. हा. सोसायटी खेडशीच्या राहिवाश्यांनी सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा