माहितीचा अधिकार दिन हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा - मनोहर गुरव' प्रचार संयोजक संगमेश्वर तालुका,माहितीचा अधिकार महासंघ मुंबई

 




संगमेश्वर : प्रतिनिधी (गणेश पवार)

२८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे निवेदन सन्मा. जिल्हाधिकारी महोदय यांना मेल द्वारे देण्यात आले आहे.सर्वसामान्यांचा असणारा कायदा म्हणून माहिती अधिकार अधिनियम २००५ या कायद्याचा व्यापक प्रचार व प्रसार व्हावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता सर्वोतोपरी उपाययोजना करण्याचे आदेश पारित करावेत.तसेच या कायद्या ची व्यापक प्रसिध्दी व्हावी  या करिता विविध माध्यमातून जनजागृती होणे आवश्यक आहे.या करिता सर्व शाळा,महाविद्यालये,उच्च व तंत्र शिक्षण विभाग,शैक्षणिक संस्थामध्ये अनेक कार्यक्रम प्रशिक्षणे,चर्चासत्रे,आयोजित करण्याचे आदेश पारित करावेत आदी मागण्यांचे निवेदन सन्मा.जिल्हाधिकारी महोदयांना देण्यात आले आहे.असे माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबईचे संगमेश्वर तालुका प्रचार संयोजक मनोहर गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

टिप्पण्या