कोसुंबमधील वैदेही पोटफोडे यांचे निधन
संगमेश्वर : प्रतिनिधी (गणेश पवार)
देवरूख संगमेश्वर तालुक्यातील कोसूंब तांबटवाडीतील सौ. वैदेही उदय पोटफोडे पूर्वाश्रमीची साडवली गावची (जाधववाडी) सुशीला दत्ताराम जाधव यांचे दि. २४ रोज सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान एसएमएस हॉस्पिटल देवरुख येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या ५० वर्षांच्या होत्या.
त्या 1994 पासून ते 2007 पर्यंत मातृमंदिर या संस्थेत कार्यरत होत्या. त्या मातृमंदिर संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी असायच्या. महिला उद्योग कार्यक्रम त्यांनी मातृमंदिर संस्थेत चांगला राबिवला. संस्थेच्या प्रमुख नारकर मॅडम यांच्या त्या अतिशय विश्वासू होत्या. मातृमंदिर नंतर त्यांनी कोसुंब गावात पाणलोट हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवला. वाडीत नळ पाणीपुरवठा योजना केली. अंगणवाडीसाठी प्रयत्न केले. पाण्यासाठी बंधारे व्हावेत म्हणून प्रयत्न केले तसेच त्यांनी बुरंबी येथे पतसंस्थेचे काम पाहिले.
सध्या त्या रवींद्र माने साहेब यांच्या जिजाई पतसंस्थेत गेले वर्षभर काम करीत होत्या. जिजाई पतसंस्थेत ठेवी ठेवण्यासाठी लोकांना समुपदेश करायच्या. पिगमी गोळा करून सभासद वाढविण्याचा प्रयत्न करीत असत. त्यांना जिजाई पतसंस्थेत पतसंस्थाप्रमुख नेहा माने व प्रमोद खामकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असे त्या सांगत असतं. त्यांचे पती उदय पोटफोड व त्यांचे कुटुंब यांची त्यांना कामात खंबीर साथ होती. त्यांच्यावर कोसुंब येथे रात्रौ 9.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला साडवली व कोसुंबमधील जेष्ठ, श्रेष्ठ नातेवाईक व मित्र परिवार मंडळी असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा