कोकणात शिवसेनेला सुरुंग लावण्याची तयारी, शिंदे गट लवकरच देणार हा मोठा धक्का.
रत्नागिरी : प्रतिनिधी (योगेश मुळे)
कोकणात उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना ( Shiv sena News ) नेते भास्कर जाधवांच्या मतदारसंघातच ( Bhaskar Jadhav ) आता भास्कर जाधव यांना दणका देण्याच्या तयारीत मुख्यमंत्री शिंदेंचा गट तयारीत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरवात केली असून त्याची सुरवात त्यांनी गुहागर मतदारसंघातून केली आहे. गुहागर शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख अमरदीप परचुरे सह उपतालुका प्रमुख मुन्ना तावडे, सुमेध सुर्वे, रोहन भोसले,सुशील आग्रे शिंदे गटात हे जवळपास निश्चित झाले आहे. ही यादी अजूनही वाढण्याची शक्यता असून गुहागर विधानसभा मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
गुहागर येथील शिवसेनेच्या तीन सरपंचांसह अनेक पधादिकाऱ्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. ही भेट बुधवारी २८ सप्टेंबरला रत्नागिरीत झाली आहे. या भेटीत प्रवेश करण्याचा निर्णय झाला आहे. लवकरच प्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहे, अशी माहिती आहे.
भास्कर जाधव यांना टक्कर देण्यासाठी गुहागरमध्ये भैया सामंत यांनी राजकीय खेळीला सुरवात केली आहे. नाराज शिवसैनिकांच्या गटाचा गुहागरमध्ये भास्कर जाधवांना फटका बसण्याची शक्यता आहे. आम्ही शिवसेनेत पहिल्यापासून प्रामाणिक काम करतोय. मात्र कामे देताना अन्य बाहेरच्या लोकांना दिली जातात, असा आरोप काही नाराज पदाधिकारी खासगीत व्यक्त करत आहेत.
ठेकेदार वर्गातूनही भास्कर जाधव यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याची चर्चा आहे. शिंदे गटातील नेत्यांसोबत अणखीही काही जणांच्या छुप्या बैठका सुरू आहेत. यामध्ये काही चिपळूण शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा समोर येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा