विदर्भ दौऱ्यानंतर आता राज ठाकरे कोकण दौऱ्यावर
विदर्भ दौऱ्यानंतर आता राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या सात ऑक्टोबरपासून राज ठाकरे यांच्या ‘मिशन कोकणला’ सुरुवात होणार आहे. राज ठाकरे यांचा हा दौरा सहा दिवसांचा असणार आहे. ते कोल्हापुरातून तळकोकणात दाखल होणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात प्रत्येकी दोन दिवस राज ठाकरे यांचा दौरा असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील मनसे सौनिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे
मनसे प्रमुख राज ठाकरे हे येत्या 7 ऑक्टोबरपासून कोकण दौऱ्यावर आहेत. ते कोल्हापूर मार्गे तळकोकणात दाखल होतील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात त्यांचा प्रत्येकी दोन दिवस दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये राज ठाकरे हे मनसे कार्यकर्त्यांशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्याची देखील शक्यता आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा