वाशिष्ठी नदीवरील एन्रॉन पुलाच्या दुरूस्ती निविदेला प्रतिसाद नाही, काम रखडणार
चिपळूण : प्रतिनिधी (दिगंबर घाग)
महापुरात खचलेल्या येथील वाशिष्ठी नदीवरील एन्रॉन पुलाच्या दुरूस्तीसाठी जुलै महिन्यात १ कोटी ८७ लाख खर्चाची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केली. मात्र निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने बांधकाम विभागाने दुसर्यांदा निविदा प्रसिद्ध केली आहे. मात्र त्यालाही प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी पूल दुरूस्तीचे काम आणखी काही दिवस रखडणार आहे.
२२ जुलै २०२१ मधील महापुरात या पुलाचा पेठमाप बाजूकडील एक पिलर खचला. परिणामी पूल धोकादायक बनल्याने तेव्हापासून अध्यापपर्यंत या पुलावरील वाहतूक बंद आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा