नरेंद्रजी मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा भाजप संगमेश्वर तालुका व डिंगणी भाजपच्या माध्यमातून सोहळा संपन्न


 संगमेश्वर : प्रतिनिधी (गणेश पवार)

भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात सेवा पंधरवडा सुरू असून त्याचाच भाग म्हणून डिंगणी मधे खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष सदानंद भागवत सर यांच्या माध्यमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप. व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण.

तसेच डिंगणी गुरववाडी शाळा दुरुस्ती काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन संगमेश्वर भाजप तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव, तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम, सरचिटणीस यशवंत गोपाळ, माजी सरपंच शशिकांत गुरव, विशाल कदम, सूर्यकांत तळेकर, शिक्षक जाधव सर, थरवल सर व शिक्षक तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उस्थितीत हजर होते

टिप्पण्या