दिवा ते सी.एस.टी लोकल रेल्वे सेवा सुरु करा - समाजसेवक अमोल केंद्रे यांची मागणी


 ठाणे :प्रतिनिधी (निलेश घाग)

समाजसेवक अमोल केंद्रे यांनी जिल्हाधिकारी तसेच म.रे महाप्रबंधक छत्रपती शिवाजी टर्मिनल्स सचिव साकेत मिश्राजी यांच्याकडे पत्राद्वारे रेल्वे प्रवाश्यांसाठी काही मागण्या केल्या आहेत. समाज सेवक अमोल केंद्रे  यांनी दिवा ते सी.एस.टी रेल्वे लोकल सेवा (Diva to CST Local Railway) सुरु करावी अशी मागणी मध्य रेल्वे सचिव साकेत मिश्राजी यांच्याकडे केली आहे. तसेच मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येणाऱ्या ठाणे व रायगड मधील रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सोयी - सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वकष आराखडा तयार करावा दिवा ते सी.एस.टी लोकलसेवा सुरु व्हावी अशी नागरिकांकडून वारंवार मागणी होत आहे. दिवा महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येत असल्याने नागरी वसाहत ५ लाखाहून जास्त आहे. सध्या दिवा ते रोहा दरम्यान रेल्वे शटल सेवा सुरु असून दर दिवशी ठराविक वेळेतच या गाड्या सुटतात. 
असे असताना दिवा स्थानकात प्रसाधन ग्रह तसेच आरक्षण खिडकी नसल्यामुळे  प्रवाश्यांना ठाणे तसेच डोंबिवली स्थानकात आरक्षणासाठी पायपीट करावी लागत आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. दातिवली, निळजे, तळोजा पंचानंदसह अगदी कळंबोली पर्यंत मोठमोठे गृहप्रकल्प झालेले आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे सुरु असून दिवसेंदिवस येथील लोकसंख्या वाढत आहे. निळजे, तळोजा येथील नागरिकांना लोकल रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास डोंबिवली, दिवा, या स्टेशनवर गेल्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोयही होते. त्यातच परिवहन सेवाही अपुरी असून या परिसरातून मुंबई-ठाणे परिसरात नोकरी व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होतात.
तसेच या दिवा परिसरातून केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मल्टीमॉडेल कॉरिडॉर व बुलेट ट्रेन प्रकल्प जाणार असून त्याचेही काम सुरु आहे. अशा मोठमोठ्या प्रकल्पांमुळे लोकसंख्या वाढत असताना सोयीस्कर दळणवळणाच्या दृष्टीकोनातून दिवा सी.एस.टी लोकलसेवा सुरु करणेच हाच उत्तम पर्याय आहे, असे अमोल केंद्रे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. अन्यथा रेल रोको आंदोलन करण्यात येईल


















टिप्पण्या