देवरूखात माता सुरक्षित तर घर सुरक्षित उपक्रमांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ

संगमेश्वर : प्रतिनिधी (गणेश पवार)

माता सुरक्षित तर घर सुरक्षित शासनाच्या या उपक्रमांतर्गत देवरूखात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ देवरूख नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांच्याहस्ते करण्यात आला. 

महाराष्ट्र शासनाने नवरात्र उत्सवानिमित्त "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व माता-भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या उपक्रमांतर्गत देवरुख ग्रामीण रुग्णालय येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर दि. २५ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ देवरुख नगराध्यक्षा मृणाल शेटये यांच्याहस्ते आणि तालुका आरोग्य अधिकारी सौ. एस. एस. सोनवणे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाँ. संदीप माने, डाँ. गौरव धामणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या आरोग्य शिबिराचा लाभ सर्व माता-भगिनींनी घ्यावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या