ढाकमोली गावात कृषी माहिती केंद्रांचे उदघाटन

चिपळूण : प्रतिनिधी (दिगंबर घाग)

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यास उपयुक्त अशी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषीकन्या कु. सिमरन चंद्रकांत दळवी, कु. दिव्या दिपक दवंडे, कु.ऋतुजा संजय बारवकर, कु.दुर्वा सर्जेराव शिनगारे, कु.सोनल कुंदन सुर्वे यांनी शेतकरी मित्रांसाठी ढाकमोली गावात शेतकरी माहिती केंद्र ही सुविधा सुरू केली आहे. या केंद्राचे उद्घाटन सोहळा गावचे सरपंच श्री. राजेश शांताराम लाड यांच्या हस्ते पार पडला तसेच या समारंभाला गावचे ग्रामसेवक,सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते .

गावात शेतकरी समुदायासाठी उपरोक्त सर्व प्रकल्प , कृषि विभागातील इतर योजना तसेच सेंद्रिय शेती व आधुनिक शेती माहिती एकाच ठिकाणी एकत्रितरित्या उपलब्ध केल्या आहेत. शेतकरी समुदायासाठी एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध व्हावी हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

या प्रकल्पासाठी कृषीकन्यांना शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील सर व प्राध्यापक एम्. एन. पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.






टिप्पण्या