परशुराम निवेंडकर यांचा चिपळूण येथील नॅब संस्थे कडून सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव
चिपळूण : प्रतिनिधी (दिगंबर घाग)
प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे येथील आरोग्य सहाय्यक श्री परशुराम निवेंडकर याना अंधत्व निवारण आणि अंधांचे पुनर्वसन कार्यात सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्षेत्रातील असंख्य नागरिकांना मोतीबिंदू साठी तपासणी करून शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्या लोक जागृती फाऊंडेशन रत्नागिरी या संस्थेच्या माध्यमातून जिल्हातील अनेक गावात नॅब हॉस्पिटल चिपळूण याना शिबिर घेण्यासंबंधी पाठपुरावा करून अनेक ठिकाणी शिबिरे आयोजित केली व ती यशस्वी रित्या पारपडली त्या नंतर मोतीबिंदू सदृश्य रुग्णांची तदनंतर मोफत शस्त्रक्रिया ही करून घेण्यास त्यांना लागेल ती मदत ही करण्यात आली. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल जिल्हा अंधत्व निर्मूलन समितीचे नॅब हॉस्पिटल चिपळूण यांनी दखल घेऊन नुकताच नॅब चे व्यवस्थापक श्री. संदीप नलावडे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा