कोपरखैरणे विभागातील अनधिकृत बांधकामावर पालिकेची तोडक कारवाई


नवी मुंबई : प्रतिनिधी

घर क्र ५८७/२, बोनकोडे गाव, सेक्टर-१२E, कोपरखैरणे घर क्र ५९५, बोनकोडे गाव, सेक्टर-१२, कोपरखैरणे, नवी मुंबई सदर विकासक यांना त्यांनी अनधिकृतरित्या बांधकामाबाबत दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकाम करण्यासाठी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम चालू होते. पालिकेच्या अनधिकृत बांधकाम पथकाने कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून येऊन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.

टिप्पण्या