मुंबईत दादर येथे संगमेश्वर तालूक्यातील पेढांबे, धामापूर, भातगाव, करजुवे, पिरंदवणे या गावाच्या पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.


 मुंबई: प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)

संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे, धामापूर, भातगाव, करजुवे, पिरंदवणे या गावाच्या पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई चा  विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर कित्ते भंडारी सभागृह , दादर येथे रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी पार पडला. सदर कार्यक्रमात पंचक्रोशीतील विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी २३० पदवीधर, दहावी, बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. शैक्षणिक पात्रतेनुसार आपण कोणत्या क्षेत्रात आपले करिअर घडवायला पाहिजे यावर विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी प्रमुख मान्यवर श्री. प्रभाकर धनावडे- संघ प्रतिनिधी शाखा ता. संगमेश्वर तथा अध्यक्ष-माथाडि कामगार संघटना, नवी मुंबई, श्री. संदिप धुलप साहेब- अध्यक्ष कुणबी युवा संगमेश्वर, श्री. सतीश नलावडे (सामाजिक कार्येकर्ते), श्री. प्रताप भोसले साहेब (मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक), श्री. विनोद चाळके साहेब (संवेदना फाउंडेशन, मुंबई), श्री संदीप नलावडे साहेब ( सामाजिक कार्यकर्ते), श्री प्रकाश नवले साहेब (कडवई ग्रामविकास सामाजिक कार्यकर्ते), डॉक्टर खाडे साहेब (बोरीवली), श्री. विजय धामापूरकर (सामाजिक कार्यकर्ते),  श्री. संजीवन पवार (सरचिटणीस मुंबई म्युनिसिपल कामगार संघ), श्री.चंद्रकांत भामटे ( सामजिक कार्यकर्ते), श्री मनोहर लिंगावले , श्री. संजय मते , श्री. सखाराम तांबडकर , श्री. रमेश वरवटकर , श्री रमेश भेकरे ( कोतळूक गुहागर), श्री निलेश हुमणे (भातगाव), अविनाश गवतडे (गवतडे  वाडी करजुवे), विनायक साहेब नलावडे (बाविचा मोडा करजुवे), श्री महादेव वेलोंडे , श्री. विजय चांदिवडे (चांदिवडे वाडी करजुवे अध्यक्ष) तसेच पाच गावातील सर्व वाडी प्रमुख त्याच बरोबर पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी मंडळ अध्यक्ष श्री. सुनील वेलोंडे, उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत चांदीवडे, सचिव श्री. अरुण वेले, उपसचिव श्री. संजय धनावडे, खजिनदार श्री. विकास मते, उपखजिनदार  तुषार भामटे, कायदेशीर सल्लागार ऍड.सीताराम बाचिम , सल्लागार चंद्रशेखर जावळे सर, सुनील डावल, मनोज गवतडे,रुपेश हेमण, अविनाश वेले, राजेंद्र गमरे, अभि वनये, विजय नलावडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या