वयाच्या पंचविशीत ती बनली ग्रामपंचायत सदस्या धामणी घाणेकर वाडीतील तरुणी प्रणिता बनली लहान वयात सदस्या.
बारावी वाणीज्य शाखेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन वयाच्या पंचविसाव्या वर्षी ती बनली ग्रामपंचायत सदस्या.
संगमेश्वर तालुक्यातील धामणी घाणेकर वाडीतील तरुणी
दोन वर्षांपूर्वी मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाणारी निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत
दोन वर्षांपूर्वी गावच्या विकासासाठी काहीतरी करायचं या उद्देशाने तिने निर्णय घेतला आणि सुदैवानं त्यांचा वॉर्ड महिलांसाठी राखीव पडला आणि प्रत्येक नागरिकांनी तिच्यावर विश्वास दाखवला, ती म्हणजे धामणी ग्रामपंचायत सदस्या प्रणिता वामण घाणेकर धामणी गावात सर्वात लहान वयाची सदस्य म्हणून ती बिनविरोध निवडून आली.
आपल्या गावचा विकास आणि आपणही एक महिला आहे आणि आपण महिलांसाठी काहीतरी काम करण्याचे तिचे मानसं आहे.
गावातील महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत, गाव पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक झाली होती.
प्रणिता हि नजिकच्या शोरूममध्ये कार्यरत आहे. नोकरी करुन ती गावच्या विकासासाठी आवश्यक असेल ते करण्याची जबाबदारी घेतली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त विविध महिलांना रोजगार कसा उपलब्ध यासाठी देखील तिनं आपल्या सहकारी सदस्यांना पाठिंबा देत आहे.
विविध उपक्रम घेऊन महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे तिने सांगितले आहे. आपल्या गावचा सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असेल ते मी करणार कारणं लोकशाही मार्गाने हि निवडणूक झाली आहे त्यामुळे गावातील नागरिक यांनी माझ्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे, त्यामुळे त्यांना सोबत घेऊन आणि माझे ग्रामपंचायत मधील सहकारी यांना विश्वासात घेऊन गावात विकास करणार.
शासनाच्या सर्व सुविधा गावच्या विकासासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे लक्षात घेऊन कामं करत राहीन असंही प्रणिता बोलते जाते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा