राज ठाकरेंचा 'तो सल्ला एकनाथ शिंदेंनी ऐकायला हवा होता'


औरंगाबादः (प्रतिनिधी)

शिंदे गट आणि ठाकरे गटातील दसरा मेळाव्याच्या वादावर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी गौप्यस्फोट केलाय. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंचा सल्ला ऐकला असता तर ही स्थिती उद्भवली नसती असं मनसेचे प्रकाश महाजन म्हणालेत.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास उद्धव ठाकरेंना हायकोर्टाने  परवानगी दिल्यानंतर जनतेची सहानुभूती ठाकरेंच्या बाजूने गेली.

दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्कचं राजकारण करणे कोतेपणाचं ठरेल असा सल्ला राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिला होता. आणि तो सल्ला योग्यच होता असे मनसे नेते प्रकाश महाजन सांगितलं.

शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सल्ला ऐकला असता तर अशी वेळ आली नसती असा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे.राज ठाकरेंनाही पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यावा अशी मागणी केली होती. 

मात्र दसरा मेळावा- बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे अनेक वर्षांचे समीकरण आहे. त्यात आपण जाणे चुकीचं लक्षण ठरेल असे राज ठाकरेंनी म्हटले होते अशी माहिती प्रकाश महाजन यांनी दिली.

टिप्पण्या