वाळू वाहतूक विरोधात रत्नागिरी पोलिसांची कारवाई
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथून रविवारी सकाळी बेकायदेशीरपणे समुद्री वाळूची वाहतूक करणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . महिंद्रा गाडी आणि वाळू असा एकूण १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , विलास शंकर सुर्वे ( ५६ ) , मुकेश रामप्रताप लोहरा ( २१ , दोन्ही रा . मालगुंड भंडारवाडा , रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत . त्यांच्या विरोधात पोलीस नाईक प्रशांत लोहळकर यांनी तक्रार दिली आहे . त्यानुसार , रविवारी सकाळी हे दोघे त्यांच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो ( एमएच - ०८ - डब्ल्यू - ०८४९ ) मधून बेकायदेशीरपणे २ हजार रुपये किंमतीची अर्धा ब्रास वाळूची वाहतूक करत असताना ही कारवाई करण्यात आली .अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा