संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना श्रद्धांजली ; महाराष्ट्र संरक्षण संघटना

मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्या भूमिपुत्रांच्या बलिदानाचे त्यांच्या शौर्याचे व त्यांच्या त्यागाचे प्रतीक म्हणून त्या सर्व हुतात्म्यांना स्मरण म्हणून मुंबई चर्चगेट येथे हुतात्मा चौक आज दिमाखात उभा आहे.

मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या बिगर राजकीय चळवळ असणाऱ्या महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या माध्यमातून आज सोमवार २१ नोव्हेंबर २०२२ रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणार्पण करणाऱ्या त्या सर्व हुतात्म्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन  श्रद्धांजली वाहण्यासाठी महामुंबईतील मराठी माणसांसह महाराष्ट्र संरक्षण संघटनेचे सर्व कार्यशील कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी त्या सर्व भूमिपुत्रांना हुतात्म्यांना स्मरण करून श्रद्धांजली वाहण्यासाठी चर्चगेट मुंबई येथे उपस्थित होते.

सदर संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. धर्मेंद्र घाग ह्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी संबधीत महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांना हुतात्मा दिन चे महत्व पटवून देऊन मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली आणि ती मिळवण्यासाठी आपल्या १०७ मराठी बांधवानीआपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्यांचे उपकार सदैव आपल्या स्मरणात राहो म्हणून प्रत्येक मराठी लोकांनी घरा घरात, विभागावर शहर तालुका जिल्हा स्तरावर हुतात्मा दिन हा स्मरण दिन म्हणून साजरा करावा. तसेच संघटनेचे उपाध्यक्ष श्री। मुकुंद गावडे, संघटनेचे प्रवक्ते मंदार नार्वेकर ह्यांनी देखील हुतात्मा दिन चे महत्व पटवून देत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. धर्मेंद्र घाग, उपाध्यक्ष श्री. मुकुंद गावडे, अमर कदम, रवींद्र शिंदे, सरचिटणीस रवींद्र कुवेस्कर, संघटने चे प्रवक्ते श्री. मंदार नार्वेकर, सुयोग पवार, अनिल हातेकर, उत्तर मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजेंद्र गोलतकर, राजेंद्र भगत, श्रीकांत शिंदे, महेश धुरी, विक्रम कदम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या