अतुल्य भारत रोलर स्केटिंग यात्रा....कश्मीर पासून कन्याकुमारी ११ नारी-शक्तिचा पाच हजार किमी प्रवास

चिपळूण : प्रतिनिधी

रताच्या अमृत महोत्सवा निमित्त वारणसी येथील राजेश डोगरा रोलर स्केटिंग अकादमी तर्फे श्रीनगर ते कन्याकुमारी असा पाच हजार किमी प्रवास करणार आहेत.विशेष म्हणजे सगळ्या महिला हा प्रवास करणार आहेत.

         २७ सप्टेबर २२ पासून काश्मीर येथील श्रीनगर येथून प्रवासाला सुरवात झाली आहे.भारतातील १३ राज्य,१०० शहर आणी दहा किमी गावातून प्रवास करत कन्याकुमारी येथे २५ डिसेंबर २२ ला ह्या अतुल्य प्रवासाची सांगता होईल.

       प्रवासात एक लाख वृक्षरोपण केल जाईल.विविध भारतातील अतुल्य परंपराना भेटी देत पर्यावरण आणी ग्राहक जागृती करत ही मातृशक्ती मार्गक्रमण करणार आहे.महाराष्ट्रात ह्या यात्रेच आगमन दिनांक १८ नोव्हे. ला पालघर येथे आगमन झाले आहे.प्रवासात भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपतीचा आशीर्वाद घेऊन दिनांक २६ नोव्हेंबर ला रत्नागिरी जिल्ह्यात प्रवास चालू होणार आहे.

      चिपळूणात रत्नागिरीला प्रयाण करत असताना दिनांक २६  नोव्हेंबर  ला  परशुराम भूमीत आगमन होणार आहे.ह्या मातृशक्ती चे स्वागत करण्याची संधी चिपळूण वासियांना मिळणार आहे.चला तर मग करूया मातृशक्तिचा दिनांक.


दिनांक : 27 नोव्हेंबर 22

स्थळ : विद्याभारती भवन, DBJ महाविद्यालय समोर, जुने देसाई हॉस्पिटलच्या मागे.मुंबई गोवा हायवे. चिपळूणवेळ : सकाळी ११ वाजता

चला तर स्वागत करूया मातृशक्तीचे

टिप्पण्या