लांजा तालुका भाजपामय झाला पाहिजे, लागेल तो निधी दिला जाईल ;बावनकुळे
आगामी काळात संपूर्ण लांजा तालुका हा भाजपामय झाला पाहिजे . यासाठी लागेल तो निधी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल असे ठोस आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लांजा येथे दिले .
रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी लांजा येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला . शहरातील संकल्प सिद्धी सभागृहात पार पडलेल्या भाजपा मेळाव्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नेत्या चित्रा वाघ , जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन तसेच अतुल काळसेकर , माजी आमदार प्रमोद जठार , शैलेंद्र दळवी , तालुकाप्रमुख महेश खामकर आदी उपस्थित होते . उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बावनकुळे यांनी सांगितले की , आगामी काळात संपूर्ण लांजा तालुका हा शतप्रतिशत भाजपामय झाला पाहिजे . यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या लोक कल्याणकारी योजना या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा . या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करा . तालुक्याच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल असे ठोस आश्वासन त्यांनी येथील पदाधिकाऱ्यांना दिले .
या कार्यक्रमाला भाजपाचे शहराध्यक्ष प्रमोद कुरूप , तालुका प्रभारी वसंत घडशी , नगरसेवक संजय यादव , मंगेश लांजेकर , जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे तसेच हेमंत शेट्ये , ओबीसी सेलचे दादा भिडे , अशोक गुरव , बाबा राणे , विशू जेधे , रवींद्र कांबळे , तालुका सरचिटणीस विराज हरमले आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा