लांजा आगरवाडीतील कुलदिप आगरे बेपत्ता,तीन दिवसांपासून शोध सुरु

कुठेही दिसून आल्यास त्वरीत संपर्क साधण्याचे कुटूंबियांचे आवाहन...

लांजा (प्रतिनिधी)

राजापूर येथे गेलेला लांजा आगरवाडी येथील २१ वर्षीय कुलदिप दर्शन आगरे हा युवक गेल्या तीन दिवसांपासून  बेपत्ता असून घरी न आल्याने कुटूंबियांनी शोधाशोध सुरु केली आहे.याबाबत लांजा पोलीस स्टेशनांत हरविल्याच्या तक्रार दाखल झाली असून लांजा पोलिसही त्याचा शोध घेत आहे.

लांजा आगरवाडी येथील रहिवासी श्री दर्शन आगरे यांचा मुलगा कुलदिप आगरे हा युवक येथीलच लांजा महाविद्यालयात एसवायबीकाँम या शाखेत शिकत आहे.शनिवारी सकाळी आपल्या मित्राबरोबर तो राजापूर येथे गेला होता.दरम्यान मित्राला वैयक्तीक काम असल्याचे सांगत तो पुढे निघून गेला.आणि तो तीन दिवस झाले तरी घरी पोहचलाच नसल्याने कुटूंबियांपुढे भिती निर्माण झाली आहे.

कु.कुलदिप दर्शन आगरे हा ४.५ उंचीचा आहे.रंग गोरा आहे.सकाळी गुलाबी शर्ट आणि जीन्स घालून गेला आहे.गळ्यात काँलेजचा आयडीही आहे.पायात पांढरे बूट,काँलेज बॅग असून सध्या राजापूर परिसरात लोकेशन ट्रक होत असल्याचे पोलिसांचे म्हणने आहे.जर कुठे आढळून आल्यास मंगेश बापेरकर – 8412999800, श्री दर्शन आगरे – 8208127431 या नंबरवर तातडीने संपर्क करा असे आवाहन कुटूंबियांमार्फत करण्यात आले आहे.

टिप्पण्या