दिवा शहरातील रेल्वे,महापालिका, पोलीस, महापालिका आयुक्तांच्या दालनात विभागांच्या अधिकाऱ्यांची विकासकामांवर संयुक्त बैठक घेण्यात आली ; राजू पाटील मनसे आमदार
ठाणे : प्रतिनिधी
दिवा शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईबाबत ठामपा अधिकाऱ्यांकडून होणारी दिरंगाई, दिवा स्थानक परिसरात रिक्षा चालकांच्या बेशिस्तीमुळे होणारी वाहतूककोंडी, दिवा रेल्वे स्थानक उड्डाण पूलाच्या पश्चिमेचा आराखडा, दिवा परिसरातील भीषण पाणी टंचाई आणि सोसायट्यांना विनाकारण आकारले जाणारे अतिरिक्त बिल, दिवा स्थानक परिसरात सार्वजनिक शौचालय नसल्याने होणारी प्रवाश्यांची गैरसोय, दिवा स्थानक परिसरातील फेरीवाल्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास, बी.एस.यु.पी योजनेतील बाधितांना पुनर्वसनानंतर न मिळणाऱ्या सोयीसुविधा, दिव्यातील (दातीवली येथे) आरक्षित जागेला संरक्षित भिंत बांधणे यांसह अन्य विषयांवर चर्चा करत अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या बैठकीला ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर,मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील, विभाग अध्यक्ष शरद पाटील यांसह ठाणे मनपाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा