मनसे "खेड तालुका सचिवपदी" कृष्णा शेलार यांची निवड
खेड : प्रतिनिधी (सैफ चौघुले)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुजननायक सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष दिनेश उर्फ नाना चाळके यांच्या उपस्थिती मध्ये मनसे खेड तालुका सचिव पदी श्री. कृष्णा शेलार यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी त्यांना नियुक्तीपत्रक सुपूर्द करतांना मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा मा.नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर, तालुकाध्यक्ष दिनेश उर्फ नाना चाळके,तालुका उपाध्यक्ष संजय आखाडे,मनविसे मा. जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी, व ईतर मान्यवर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा