मुन्ना देसाई यांची बाळासाहेबांची शिवसेना युवासेना रत्नागिरी जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती.
रत्नागिरी : प्रतिनिधी (योगेश मुळे)
मुन्ना देसाई यांची बाळासाहेबांची शिवसेना युवासेना रत्नागिरी जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री ना उदय सामंत यांनी केली . मुन्ना देसाई गेले १० वर्ष हून अधिक काळ ना. सामंत व उद्योजक किरण भय्या सामंत यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत . सामाजिक क्षेत्रात पुढे असणारे तसेच रत्नागिरी तालुक्यात कुठे मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला तर सर्वांत जास्त मदत करायला लोकांना मदत कशी होईल या मधे मुन्ना देसाई पुढे असतात , रक्तदान , असो क्रीडा क्षेत्रात मदत करायला पुढे असतात कोकणात मुन्ना देसाई यांचा तरुण पिढी मध्ये दांडगा संपर्क आहे. ना. उदय सामंत यांनी मुन्ना देसाई यांची बाळासाहेबांची शिवसेना युवासेना रत्नागिरी जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती केली. उद्योजक किरण भय्या सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित , जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण ,रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सहदेव बेटकर, नूतन तालुका प्रमुख बाबू म्हाप ,तसेच जिल्ह्यातून विविध भागातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. जिल्हा मध्ये युवा सेना कशी संघटना वाढेल कार्यकर्त्यांना बळ तसेच पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन मुन्ना देसाई यांनी दिले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा