कणकवलीत भाजपची भव्य बाईक रॅली; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अग्रस्थानी
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या स्वागताकरिता कणकवली विधानसभा मतदारसंघात वागदे गणपती मंदिर ते वृंदावन हॉल कलमठ पर्यंत काढलेल्या मोटर सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो मोटारसायकल व भाजपाचे झेंडे यामुळे भाजपामध्ये वातावरण निर्माण झाले होते. आमदार नितेश राणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅली सहभागी झाल्याने या रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ही स्वतः बुलेट स्वार बनले. तर त्यांच्या मागे आमदार नितेश राणे बसले होते. तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संजना सावंत यांच्या दुचाकी वर प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ बसल्या. व रॅली ची सुरुवातच प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी रॅलीत आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जि प माजी अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर, उत्तम बिर्जे, सावी लोके, अफरोज नवलेकर, तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, प्राची कर्पे, संजना सदडेकर, मेघा गांगण, किशोर राणे, माजी सरपंच संदीप सावंत, संतोष पुजारे, समीर प्रभूगावकर, समीर सावंत, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, संदीप मेस्त्री, सोनू सावंत, आनंद सावंत, समीर प्रभूगावकर, गणेश तळगावकर आदी उपस्थित होते. सुमारे 500 हून अधिक मोटरसायकल स्वार या रॅली सहभागी झाले होते. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून सोडला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा