रेल्वेवर दगडफेक, आरोग्य केंद्र संदर्भात मध्य रेल्वेचे डीसीएम दिपक शर्मा यांना निवेदन, तात्काळ अम्मल बजावणी करण्याचे रेल्वेचे आश्वासन
ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)
मध्य रेल्वे मार्गावर अद्यापही दिवा रेल्वे स्थानकावर रेल्वेचे आरोग्य केंद्र (इएमआर) इमर्जन्सी मेडिकल रूम नाही तसेच काही दिवसापासून लोकल तसेच मेल एक्सप्रेस वर दगडफेकीच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याने ठाणे रेल्वे स्थानक येथे झालेल्या रेल्वे सल्लागार कमिटी बैठकीत दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे आरोग्य केंद्र तसेच रेल्वेवर दगडफेक संदर्भात अमोल कदम यांनी मध्य रेल्वेचे डीसीएम दिपक शर्मा यांना निवेदन दिले.
मध्य रेल्वे मार्गावर लोकल तसेच मेल एक्सप्रेस वर दगड फेक करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे आरपीएफ, जीआरपी तात्काळ सदर घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन जनजागृती करत आहेत. तसेच दगड फेक करणाऱ्याचा शोध देखील घेत आहेत. पण दगडफेकीचे प्रमाण वाढत असल्याने अशा घटनामुळे प्रवासी जखमी होत असून यामुळे रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दगड फेक करणाऱ्या वर कडक कारवाई करावी तसेच दिवा रेल्वे स्थानक येथे आरोग्य केंद्र नसल्याने जखमी प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून लवकरात लवकर दिवा स्थानक येथे आरोग्य केंद्र उभारून सुरु करावे आणि मुंब्रा, डोंबिवली रेल्वे स्थानकावर बंद असलेले वन रुपी क्लिनिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करावे, कळवा, मुंब्रा रेल्वे स्थानक तेथे जलद लोकल ला थांबा देण्यात यावा, कळवा कारशेड लोकल सकाळच्या वेळेत कळवा रेल्वे स्थानकातून सुरू करावी अशा समस्यांचे निवेदन सेंट्रल रेल्वे ठाणे रेल्वे स्थानक सल्लागार कमिटी सदस्य अमोल कदम यांनी सोमवार दिनांक 28 नोव्हेबर रोजी झालेल्या सल्लागार कमिटीच्या बैठकीत विषय मांडून
मध्य रेल्वेचे डीसीएम दिपक शर्मा यांना निवेदन दिले. या प्रसंगी तत्काळ वरिष्ठांशी संपर्क करून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात येतील असे आश्वासन मध्य रेल्वेचे डीसीएम दिपक शर्मा यांनी दिले. याप्रसंगी आरपीएफचे अधिकारी आर. एस. चौधरी, जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे, स्टेशन मॅनेजर तसेच रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.
************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा