रत्नागिरी अर्बन को- बँकेच्या तज्ञ संचालक पदी डॉ प्रतिक सुजित झिमण यांची आज निवड करण्यात आली .

रत्नागिरी : प्रतिनिधी

        रत्नागिरी शहरानजिक असलेल्या  रत्नागिरी अर्बन को- बँकेच्या तज्ञ संचालक पदी डॉ प्रतिक सुजित झिमण यांची आज निवड करण्यात आली . 

        आरोग्य , सामाजिक, राजकीय क्षेत्रात कायम अग्रेसर असलेले नाव आता सहकार क्षेत्रात सुद्धा ऐकायला येणार आहे . रत्नागिरी को - ऑप बँकेच्या संचालक पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या असणाऱ्या जनसंपर्काचा फायदा  बँकेला नक्कीच  होईल , त्यांच्या मनातील नवनवीन संकल्पना राबविण्यात येणार असून ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचा मानस डॉ प्रतिक झिमण यांनी व्यक्त केला आहे . बँकेचे ठेवीवरील आकर्षक व्याजदराचा फायदा जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन बँकेच्या वतीने डॉ प्रतिक सुजित झिमण यांनी केले आहे . नियुक्ती झाल्यानंतर डॉ प्रतिक झिमण यांच्या मित्र परिवाराने अभिनंदन केले

टिप्पण्या