ठाणे महानगरपालिकेतर्फे शहरात कोरोना चाचणी ( antigen test ) सुरु.
ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)
चीनसह जपान, फ्रान्स देशात कोरोनाचा उद्रेक होत आहे या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून ठाणे महापालिकेतर्फे शहरातील मुख्य बाजारपेठेत कोरोना चाचणी ( antigen test ) सुरु केली असून बाजारातील व्यापाऱ्यांना तसेच बाजारात येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन मेगा फोनद्वारे करण्यात येत आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर हे शहरात दैनंदिन कोव्हीड चाचण्या आणि लसीकरणाचा आढावा घेत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा