दिव्यातील समर्थ नगर ते के.जे कॉम्प्लेक्स संथ गतीने चालू असलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा;मनसे शहर सचिव प्रशांत गावडे

दिवा : प्रतिनिधी

समर्थ नगर मधील समर्थ नगर ते केजे कॉम्प्लेक्स या नवीन रस्त्याचे काम ठाणे महानगर पालिकेच्या अंतर्गत चालू असून ह्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते, या कामासाठी रस्त्याचे खोदकामासाठी रस्त्याची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
या विभागातील हा रस्ता प्रमुख असून दिवा आगासन आणि मुंब्रादेवी कॉलोनी यांना जोडण्याचे काम करतो, छोटी मोठी वाहने दिवा आगासन रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वापर करतात तसेच परिसरातील रहिवाश्यांना जोडण्याचे काम करतो, ह्याच रस्त्यावर भारत इंग्लिश स्कुल व विद्या ज्योती शाळा आहेत, शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच पालकांना ठाणे पालिके अंतर्गत संथ गतीने चालू असलेल्या रस्त्याच्या कामाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडी तसेच दगडांमुळे शाळेतील विध्यार्थ्यांना पाय घसरून इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत प्रशांत गावडे यांनी व्यक्त केले.
तसेच चालू रस्त्यावर बऱ्याच प्रमाणात पिण्याच्या पाण्याची गळती चालू असते त्यात पाणी टंचाईमुळे पाण्यापासून वंचित नागरिक तुटक्या पाईपलाईन मधून हंडाभर पाण्यासाठी पालिकेनी खोदून ठेवलेल्या रस्त्यावर ठेचा खात पाणी भरत आहेत, परिस्थिती फार विदारक आहे तसेच परिसरात अचानक आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अग्निशमन व रुग्णवाहिका तिथपर्यंत पोहचण्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते याकरिता दिवा मनसे शहर सचिव प्रशांत गावडे तसेच तुषार पाटील यांनी पालिका आयुक्त यांची भेट घेऊन संबंधित ठेकेदाराला रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे ह्या करिता निवेदन देण्यात आले.
यावेळी सोनिश माधव, शैलेंद्र कदम, परेश पाटील,नम्रता खराडे
तसेच मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या