बुस्टर डोस न घेतल्यामुळे होतोय कोरोना संसर्ग? पालिकेने केले हे आवाहन
भारतात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना आता अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट बीएफ 7 ने थैमान घातले आहे. त्यामुळे भारतासह आता सर्व देशांमध्ये कोरोना संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. यात आता कोरोनाविरोधी लसीचा बुस्टर डोस न घेतलेल्यामुळेच कोरोना संसर्ग पसरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात मुंबईतील 92 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी फक्त 15 टक्के लोकांनी बुस्टर डोस घेतल्याचे समोर आली आहे. यामुळे बुस्टर डोस न घेतलेल्यांमुळे मुंबई महापालिकेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
अशापरिस्थितीत कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा लाभार्थ्यांनी तातडीने बुस्टर डोस घ्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आवाहनाला आता मुंबईकर कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केल्यानंतर सुमारे वर्षभराने 16 जानेवारी 2021 रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. यात 18 वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांचे पहिला आणि दुसरा असे दोन डोस दिल्याने लसीकरण पूर्ण झाले.
मात्र आरोग्य तज्ज्ञांकडून कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी बुस्टर डोस घेणे आवश्यक असल्याची सुचना केली, यानंतर जानेवारी 2022 पासून मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र ‘बुस्टर डोसला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सद्यस्थितीत पालिकेच्या 64, राज्य-केंद्र सरकारच्या 17 आणि 125 खासगी केंद्रांवर ‘बुस्टर डोस’ दिला जात आहे.
सध्या मुंबई महापालिकेकडे सहा हजार डोस आहेत. मात्र उपलब्ध केंद्रांवर मिळून दररोज सरासरी 100 जणांना बुस्टर डोस घेत आहेत. इतर देशांत कोरोनाचा पुन्हा वाढता संगर्स पाहता नागरिकांनी तातडीने ‘बुस्टर डोस’ घ्यावा असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
मुंबईतील बुस्टर डोससाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या 92 लाख इतकी आहे. यातील 14 लाख 48 हजार 785 लोकांनी बुस्टर घेतला, यात आत्तापर्यंत 5.74 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झालेय. सर्व प्रकारे 2 कोटी 21 लाख 47254 डोस दिले आहे. पालिकेच्या केंद्रांवर बुस्टर डोस मोफत दिला जात आहे. यात देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पालिका आणि सरकारी केंद्रांवर ‘बुस्टर डोस’ सरसकट सर्व लाभार्थ्यांना मोफत देण्यात येत आहे. यासाठी ‘कोकिन ऍप’मध्ये आवश्यक बदलही करण्यात आले असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा