क्लस्टर योजनेच्या माध्यमातून दिवेकरांना लवकरच हक्काचं घर मिळेल ; खासदार श्रीकांत शिंदे
ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)
दिवा महोत्सवाची जल्लोषमय वातावरणात सांगता
दिव्यात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे.लोकांना परवडणारी जी घरे आहेत ती केवळ दिव्यातच मिळतात.परंतु त्या घरांवरही अनधिकृत हा स्टँम्प आहे.हा स्टँम्प आपल्याला कायमस्वरुपी काढायचा आहे.त्यासाठी तुम्ही दिव्यातील नगरसेवकांवर,मुख्यमंत्री शिंदेसाहेबांवर दाखविलेला विश्वास कमी होता काम नये.आपल्याला कस्टरसारख्या योजनेच्यामाध्यमातून हक्काचे आणि सुरक्षित घर मिळेल असे प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे यांनी चौदाव्या दिवा महोत्सवानिमीत्त केले.
धर्मवीर मित्रमंडळ आणि बाळासाहेबांची शिवसेना आयोजित दिवा महोत्सव गेली पाच दिवस जल्लोषमय वातावरणात सुरु आहे.गेल्या चौदा दिवा महोत्सवापैकी यावर्षी मोठी गर्दी झालेली पहावयास मिळाली.लोकांच्या गर्दीमुळे हा महोत्सव ऐतिसाहसिक झालेला पहायला मिळाला.काल दिवा महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली.यावेळी जमलेल्या जनसमुदायाचे आभार मानले.यावेळी संबोधित करताना दिव्यातील अनधिकृत असलेल्या आणि वारंवार असुविधांपासून वंचित असलेल्या दिव्याबाबत प्रश्न मांडले.ते म्हणाले की,दिवा शहर हा सर्वांना सामावून घेणारा शहर आहे.या शहरात मध्यम,कनिष्ठ व श्रीमंत असे सर्वच प्रकाचे लोक राहत आहेत. म्हणून येथील जनतेसाठी रेल्वेच्या सुविधा असतील,त्याचबरोबर महापालिकेच्या सुविधा असतील त्या समस्यांपासून दिवावाशियांची सुटका झाली पाहीजे.या हेतून आपले पदाधिकारी व सदस्य याठिकाणी काम करीत आहेत.त्यांच्या माध्यमातून आज दिव्यात सातशे ते आठशे कोटींची कामे झालेली आहेत.तेथील नगरसेवकांवर,मुख्यमंत्री शिंदेसाहेबांवर जो तुम्ही विश्वास दाखवित आहेत तो भविष्यात कमी होता काम नये.पुढेही त्या अनुषंगाने पुढे कामे चालूच राहणार आहेत.
दिव्याला हक्काची व अधिकृत घरांची गरज
दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे.लोकांना परवडणारी घरे जी आहेत ती दिव्यामध्ये मिळतात.परंतु नेहमी आपल्या दिवेकरांवर एक अनधिकृतपणाचा स्टँम्प लावला जात आहे. तो स्टँम्प कायमस्वरुपी आपल्यावरील फुसला गेला पाहीजे.त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला आनंदाची बातमी आहे की,जसे ठाण्यामध्ये क्लस्टर योजना आपण चालू झालीय.त्याच धर्तीवरती क्लस्टर योजनेचा सव्हे हा उद्या दिव्यातही सुरु होणार आहे.त्यामुळे आपल्या सगळ्यांना आपल्या हक्काचं आणि अधिकृत घर जे आहे ते या ठिकाणी भेटणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा