रत्नागिरीतील महिलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, महिला सक्षमीकरण करिता काँग्रेस पक्ष कटिबध्द : हारीस शेकासन

रत्नागिरी :-  तालुक्यातील मुस्लिम समाजातील महिलांनी आज काँग्रेसच्या आल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

      रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते रफीक मुल्ला यांच्या  प्रयत्नाने महिला कार्यकर्ती चांदबी नेवरेकर यांच्या सहकारी महिला कार्यकर्त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी हारीस शेकासन, रमेश शाहा, बंडूशेठ  सावंत व रुपाली सावंत यांनी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व सचिव रफीक मुल्ला यांचे अभिनंदन केले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी , राष्ट्रीय नेते व खासदार राहुल गांधी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार हुसैन दलवाई, प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार ॲड हुस्नबानू खलिफे व जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष महिला सक्षमीकरण करिता कटिबध्द असल्याचे प्रतिपादन हारीस शेकासन यांनी केले

     यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडूशेठ सावंत, ज्येष्ठ नेते रमेश शाहा, महिला प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत, रहिम दलाल, आतिफ साखरकर, वहीदा काझी, अकील साखरकर उपस्थित होते.

टिप्पण्या