महाराष्ट्रात मास्क सक्तीच्या हालचाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठी घोषणा करणार?
मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महाराष्ट्रातील कोण-कोणत्या मंदिरांमध्ये मास्कसक्ती?
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पुजारी आणि कर्मचाऱ्यांना मास्क अनिवार्य करण्यात आलाय. भाविकांनाही मास्क वापरण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलंय.
शिर्डीच्या साई मंदिरात आणि शनिशिंगणापूरच्या मंदिरातही मास्कसक्ती करण्यात आलीय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ही घोषणा केलीय.
तुळजाभवानी मंदिरातही कर्मचाऱ्यांना मास्कसक्ती करण्यात आलीय. भाविक मात्र मंदिरात विनामास्कच वावरत असल्याचं दिसतंय.
देहूच्या मुख्य मंदिरात भाविकांना अद्याप मास्कसक्ती करण्यात आलेली नाही. मात्र कोरोना नियमांचे पालन करण्याचं आवाहन संस्थानच्या वतीनं करण्यात येतंय.
अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिर मंदिरातही मास्क सक्ती करण्यात आलीय. भक्तांनी दर्शनासाठी मास्क घालूनच मंदिरात यावं असं आवाहन मंदिर प्रशासनानं केलंय.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी देवस्थानातही मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आलाय. मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्क परिधान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आलीय. त्यामुळं कर्मचारी आणि पुजारी मास्क लावूनच कामावर येताना दिसतायत.
भाविकांना मात्र अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाही.
चीन, ब्राझील, अमेरिका, जपान, दक्षिण कोरियात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवलीय. त्यामुळं भारतात आत्तापासूनच खबरदारी घेतली जातेय.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा