आंबा घाटात अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

संगमेश्वर : प्रतिनिधी

लुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात झालेल्या बारा चाकी टँकर व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली . 

        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , लालासो खाशबा शेवाळे वय ५६ हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी  घेऊन साखरप्याच्या दिशेने येत असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला धडक बसल्याने अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला . हा अपघात चक्री वळणाजवळ सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास घडला.

टिप्पण्या