कळसवली गावच्या सरपंच पदी देवेश गोविंद तळेकर विराजमान

राजापूर : प्रतिनिधी 

महाराष्ट्रा मध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना सर्वांचे लक्ष हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच पदाकडे लागले होते.  श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उमेदवारी असलेले नवतरुण देवेश गोविंद तळेकर बहुमताने सरपंच पदी  निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांकडून शुभेच्छा वर्षाव होत आहे.   

देशात अमृतमहोत्सव साजरा होत असताना नवतरुण यांनी ग्रामपंचायतच्या सर्वोचपदी निवड होणे ही काळाची गरज आहे.  राजापूर तालुक्यातील संस्कृतीची परंपरा जपणारे महसूलगाव म्हणून कळसवली या गावाकडे पाहिले जाते. सर्व जातिचे लोक येथे आहेत. गाव विकास हेच उद्दिष्ट मनात बाळगून निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश करण्याचे काम  देवेश तळेकर यांनी केले. 

गाव विकास हाच आमचा ध्यास! ७३ वी घटनाची प्रभावी अंमलबजावणी करून पायाभूत सेवासुविधा आणि जनतेचा गरजा समजून त्यावर काम करणार असे मत नववांचीत सरपंच मा. देवेश तळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच श्री. राजेश पांचाळ, सौ. प्राजक्ता पांचाळ, सौ. ऋतिका तरळ, श्री. जयवंत शेडेकर, सौ. अंकिता चव्हाण,  सौ. शोभा पालेकर, श्री. चंद्रकांत शेवडे, श्री. विजय सुवरे आणि सौ. दिप्ती शेडेकर या सदस्य यांना सोबत घेऊन गावविकस करीता कटीबद्ध राहणार असे ही ते म्हणाले.  स्थानिक लोकप्रतिनिधी राजन साळवी साहेब यांच्या कडून  सरपंच देवेश तळेकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नवतरुण सरपंच पदी विजयी झाल्याने कळसवली गावात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

टिप्पण्या